मी: सगळे हल्ली ब्लॉग लिहितात. काही लोक तर रतीब घालतात. म्हटलं आपण पण लिहू.
मीच: पण वाचणार कोण?
मी: आहो वाचणारे वाचतील, नाहीतर सोडून देतील.
मीच: पण लिहिणारे किती छान लिहितात.
मी: असतील लिहीत. 'जगिं राजहंसाचे चालणे जरी झालिया शहाणे, म्हणून काय कवणे चालूचि नये?'
मीच: आहो चालावे, पण चाल चोरू नये, मलिक/मियांसारखी...
मी: आहो थोरा-मोठ्यांची वाक्ये अशी घेण्यात गैर काहीच नाही.
मीच: हो ना. 'घेण्यात' काही गैर आहे असं कधीच वाटून घेतलं नाही आपण.
मी: बरं, ते जाऊ दे. पण तुम्ही लिहिणार काय?
मीच: आहो, ब्लॉगचं नावंच सांगतय काय लिहिणार ते - उगीचच काहीतरी!
मीच: आहो, ब्लॉगचं नावंच सांगतय काय लिहिणार ते - उगीचच काहीतरी!
तर एकंदरीत असं आहे!!!